आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगीनादचा थोबडेंचा इशारा:पुराव्यासह प्रश्नांची उत्तरे द्या काडादींची मी माफी मागेन

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता विस्तारीकरण करणे, महापालिकेने नोटीस देऊनही चिमणीचे बांधकाम पूर्ण करणे यांसह इतर अनेक नियमबाह्य बाबी सिद्धेश्वर कारखान्याकडून करण्यात आल्या आहेत. विद्यमान संचालक धर्मराज काडादी सिद्धेश्वर कारखान्यातील विकासकामांबाबत नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह द्यावीत, माझे चुकीचे असल्यास मी काडादी यांची माफी मागेन, कारखान्याचे संपूर्ण नुकसान भरून देईन, असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते संजय थोबडे यांनी केले आहे. विमानसेवा सुरू होण्यासाठी १२ डिसेंबरपासून महापालिकेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संजय थोबडे यांनी दिली.

२०१४ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र मिळेपर्यंत विस्तारीकरणाचे काम करू नये, असे आदेश दिलेले असतानाही २०१४-१५ मध्येच काम पूर्ण केले. २०१४ मध्ये चिमणीचे बांधकाम अपूर्ण असताना बांधकाम बेकायदेशीर असून त्या पाडण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. तरीही त्या आदेशाला न जुमानता चिमणीचे बांधकाम पूर्ण केले. याबाबत खुलासा करावा. ५ हजार मे.टनापेक्षा अधिक गाळप करायचे असल्यास पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पण २००५-२००६ पासून पर्यावरणाची ना हरकत प्रमाणपत्र न घेता बेकायदेशीर कारखाना चालविला जात आहे, याचा कारखान्याने खुलासा करावा.

तरी बोरामणी विमानतळाचा आग्रह का : बोरामणी विमानतळासाठी आवश्यक वन विभागाची जमीन, माळढोक पक्ष्यांचे वास्तव्य असल्याने जमीन देणे अशक्य असल्याचे कळविले आहे तरी बोरामणी विमानतळ सुरू करण्याचा आग्रह का करता ? असा प्रश्न थोबडे यांनी उपस्थित केला आहे. होटगी रोड विमानसेवेसाठी एनटीपीसी चिमणीचा अडथळा आहे, असे सांगितले जाते, पण एनटीपीसीने चिमणी बांधकामास डीजीसीएकडून ना हरकत प्रमापणपत्र घेतल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह दिल्यास मी काडादी यांची माफी मागतो, असे थोबडे यांनी आव्हान दिले

बातम्या आणखी आहेत...