आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकरचे छापे:तपासात सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; बँक लॉकर सील हाेते, सुरू झाले ; चाैथ्या दिवशी तपास थांबला

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२५ ऑगस्टला सकाळी सात वाजता आलेले आयकर अधिकारी सलग ७२ तासांनी म्हणजेच चाैथ्या दिवशी सकाळी साेलापूर साेडले. त्यानंतर ज्यांच्याकडे ठाण मांडून हाेते, त्यापैकी डाॅ. गुरुनाथ परळे माध्यमांसमाेर आले. त्यांनी तपासातील काही मुद्दे सांगून म्हणाले, ‘‘अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. बँकेतील माझे लाॅकर्स सील केले हाेते. ते सुरू झाले. आता काही विषय राहिलेला नाही.’’

कुंभारीत अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, बिपीन पटेल यांचे मेहुल कन्स्ट्रक्शन, डाॅ. अनुपम शहा या सर्वांचे बंगले आणि त्यांच्या कार्यालयांवर आयकर खात्याचे छापे हाेते.पंढरपूरचे अभिजीत पाटील यांच्या डीव्हीपी उद्याेग समूहातूनही रविवारी सकाळी अधिकारी बाहेर पडले. त्यानंतर श्री. पाटील यांना घेऊन उस्मानाबादच्या चाेराखळी येथील धाराशिव कारखान्याकडे गेल्याची माहिती आहे.

आयकर अधिकाऱ्यांच्या प्रश्नांचा डाॅ. परळे यांनी कथन केलेला तपशील असा प्रश्न : अश्विनी रुग्णालयात तुम्ही कुठल्या पदावर आहात? उत्तर : मी तिथला कार्डिओलाॅजिस्ट आहे. महत्त्वाच्या भूमिकेत असताे. दुसरे म्हणजे मी तिथे काही वर्षे वैद्यकीय संचालकपदावरही हाेताे. प्रश्न : संचालकपदावर असताना काही उत्पन्न मिळत हाेते? उत्तर : नाही. मलाच नाही, कुठल्याही संचालकांना उत्पन्न मिळत नाही. कारण ही सहकारी संस्था आहे. कार्डिओलाॅजिस्ट म्हणून मिळते तेवढेच. प्रश्न : अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात काय करता? उत्तर : तिथे मी ‘प्राेफेसर ऑफ मेडिसन’ या पदावर कार्यरत आहे. प्राेफेसर म्हणून वेतन मिळते. तेच उत्पन्न. तेथे इतर माध्यमातून काहीही मिळत नाही. प्रश्न : तुम्ही तिथे ट्रस्टी म्हणून काम करता काय? उत्तर : नाही. प्राेफेसरशिवाय अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाशी माझा दुसरा काहीही संबंध नाही. याशिवाय बँक खात्यांसंबंधी काही तपशील मागितला. लेखी द्यायलाही सांगितले.

बातम्या आणखी आहेत...