आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतू बंद:33 च्या दाखल्यासाठी‎ ‎ आता 300 रुपये घेतेय 'आपले सरकार'‎, सेतू सुविधा सुरू करण्याचे‎ विभागीय आयुक्तांचे सूतोवाच‎

सोलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व सेतू कार्यालये सुरू असताना सोलापुरात‎ मक्त्याची मुदत संपण्यापूर्वी पुढील कार्यवाही पूर्ण न‎ झाल्यामुळे सेतू कार्यालय बंद केले. त्यावर जिल्हाधिकारी‎ मिलिंद शंभरकर यांनी दाखल्यांसाठी महा ई सेवा केंद्रात‎ अर्ज करण्याचे आवाहन केले.

नागरिक महा ई सेवा केंद्रात‎ गेल्यावर त्यांना ७० रुपयांच्या दाखल्यासाठी ३०० तर ३४‎ रुपयांच्या दाखल्यासाठी २०० रुपये आकारणी करण्यात येत‎ आहे. पुढील महिन्यात दहावी आणि बारावीचे निकाल‎ लागतील. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची‎ गरज असते. तेव्हा गोंधळाची स्थिती उद्भवु शकते.‎

उत्तर तहसीलमध्ये आता सावली

प्रतिज्ञापत्र, तलाठ्याकडून उत्पन्न दाखला देण्याची‎ सोय उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात करण्यात‎ आली. सकाळी ११ ते २ ही वेळ देण्यात आली.‎ नागरिकांना उन्हात थांबावे लागते. अनेकजण भोवळ‎ येऊन पडल्यानंतर तेथे सावली करण्यात आली.‎

प्रभारी जिल्हाधिकारी‎ यांना बोलून माहिती घेतली‎ जाईल. सेतू सुरू‎ करण्यासाठी सांगतो.‎ समस्या माझ्या लक्षात‎ आली आहे. लगेच‎ कारवाई केली जाईल.‎

-सौरभ राव, विभागीय‎ आयुक्त, पुणे‎

सेतू बंद झाल्याने अनेक‎ सामाजिक संघटना निवेदन‎ घेऊन येत आहेत.‎ जिल्हाधिकारी प्रशिक्षणाला,‎ अतिरिक्त जिल्हाधिकारी‎ दौऱ्यावर तर निवासी‎ उपजिल्हाधिकारी शमा पवार‎ रजेवर आहेत. व्यथा‎ ऐकायला कोणीच नाही.‎