आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा दुसरे वर्ष:पवार इन्स्पायर फेलोशिपची अर्ज मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेती, शिक्षण व साहित्याच्या क्षेत्रात १३० जणांना देणार यशवंतराव चव्हाण सेंटरने गेल्या वर्षी शरद पवार इनस्पायर फेलोशिप सुरू केली. यंदा दुसरे वर्ष आहे. एकूण १३० फेलाेंची निवड केली जाणार आहे.निवड समितीने शेतीतील संशोधन कार्यासाठी ८०, साहित्यासाठी १० आणि शिक्षण क्षेत्रातील ४० अशा एकूण १३० फेलोंची निवड केली जाणार आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली फेलोशिपची सुरुवात झाली. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत आहे. कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी https://www.sharadpawarfellowship.com या वेबसाइटवर माहिती आहे. अंतिम मुदत १२ ऑक्टोबर आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. सर्व प्रस्तावांची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत तपासणी होऊन निवड प्रक्रिया पूर्ण होईल. निवड झालेल्या फेलोंची घोषणा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...