आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चेसी क्रॅक 99 बस विक्री परवानगीसाठी परिवहनचा न्यायालयात अर्ज दाखल

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका परिवहन विभागात केंद्र सरकारच्या जेएनयूआरएम याेजनेंतर्गत घेण्यात आलेल्या २०० बसपैकी ९९ जनबसचे चेसी क्रॅक झाल्या आहेत. त्या बसची मान्यता आरटीओ विभागाने रद्द केली. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. चेसी क्रॅक बसचे नुकसान होत असून त्याची विक्री करण्यासाठी मान्यता मिळावी म्हणून परिवहन विभागाने न्यायालयात अर्ज दिला आहे. त्यावर निर्णय प्रलंबित आहे. फुकटात मिळालेल्या बस भंगारात विकण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

केंद्र सरकारकडून १०० जनबस, १० व्हाॅल्वो वातानुकूलित बस आणि ९० मिनी बस परिवहन विभागास देण्यात आल्या. १०० जनबसपैकी एक बस जळाली तर ९९ बसचे चेसी क्रॅक झाल्याने आरटीओ विभागाने मान्यता रद्द केली. त्यामुळे त्या बस राजेंद्र चौक, अक्कलकोट रोड, सोरेगाव येथे पडून आहेत. १० व्हाॅल्वो बस सात रस्ता येथील डेपोत कुजत आहेत. बसप्रकरणी न्यायालयात महापालिकेने दावा दाखल केला आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. ९९ बस पडून असल्याने त्याचे नुकसान होत असल्याने त्या बस भंगारमध्ये काढण्यासाठी परिवहन विभागाने न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे. न्यायालयाच्या परवानगीविना बस भंगारात काढल्यास भविष्यकाळात अडचण येऊ शकते, त्यामुळे पालिकेने न्यायालयात धाव घेतली आहे.

परवानगीनंतर विक्री करू
चेसी क्रॅक झालेल्या बस भंगारमध्ये विकण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला आहे. परवानगी दिल्यानंतर भंगारात काढू.''
पी. शिवशंकर, पालिका आयुक्त.

बातम्या आणखी आहेत...