आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाडी:घंटागाडीसाठी आठ झोनवर सहा मक्तेदारांची नियुक्ती ; एक जूनपासून कचरा वर्गीकरण करून घेण्याची सक्ती

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका घनकचरा विभागांतर्गत येणारा घंटागाडीवरील चालक व मंजूर मक्ता महापालिकेने बदलला असून, आठ झोनसाठी सहा मक्तेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून त्यानुसार कामास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी अजय घोडके यांच्याकडे मक्ता होता. त्यांची मुदत संपल्याने नवीन मक्तेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेच्या १ ते ८ झोनमधील घंटागाडीवरील चालक व मजूर मक्तासह हुकलोडर, आरसी या गाड्यांचे चालक मक्ता महापालिकेने बदलला आहे. यापूर्वी घनकचरा विभागात महापालिकेत काम केलेल्या मक्तेदारास मक्ता देण्यात आला. यामुळे एक जूनपासून कचरा वर्गीकरण करून घेण्याची सक्ती करण्यात आली. अन्यथा दंडात्मक कारवाई नागरिकांवर होणार आहे. पालिका झाेन क्रमांक १ साठी आराध्या कन्स्ट्रक्शन, झोन क्रमांक २ साठी एन. एच. पटेल, झोन क्रमांक ३ व ७ साठी यशश्री एन्टरप्रायजेस, झोन क्रमांक ४ साठी संत गाडगेबाबा स्वयंरोजगार, झोन क्रमांक ५ व ८ साठी राजलक्ष्मी स्वयंरोजगार, झोन क्रमांक ६ साठी अजय घोडके यांना मक्ता देण्यात आला आहे. यांच्यामार्फत घंटागाड्या चालू असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...