आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यमंत्री:थकीत 64 लाखांच्या भाडे वसुलीस आरोग्यमंत्री सावंत यांच्याकडून खो

सोलापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियममधील ५९ गाळ्यांच्या थकीत ६४ लाख रुपयांच्या वसुलीस राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ‘खो’ दिला. ही वसुली मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली होती.

स्टेडियममधील गाळे उच्च व्यावसायिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथील गाळेधारकांकडे तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांचे भाडे थकले होते. त्याच्या वसुलीची मोहीम आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुरू केली होती. त्यापैकी ८० लाख रुपये गाळेधारक व्यापाऱ्यांनी भरले. उरलेल्या ६४ लाख रुपयांसाठी नोटीस देऊन मंगळवारी कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे होते. त्यांनी थेट श्री. सावंत यांना फोन लावला. त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. ‘२९ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी असल्याने तोपर्यंत थांबा’ असा सल्ला सावंत यांनी दिल्याने कारवाई थांबली. माजी नगरसेवक चेतन नरोटे यांनीही कारवाई थांबण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली. या वेळी सुमारे ५० व्यापारी उपस्थित होते.

सुनावणीमुळे तूर्त थांबू
२९ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे तूर्त थांबणार अाहोत. गाळेधारक व्यापाऱ्यांकडे १.४४ कोटी येणे आहे.''पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त

गाळेधारक व्यापाऱ्यांनी मंत्र्यांकडे मांडले गाऱ्हाणे
महापालिका यापूर्वी गुडीपाडव्याच्या पूर्वी गाळे सील करून व्यापाऱ्यांचे नुकसान केले. आता दसरा व दिवाळी उत्सवासाठी व्यापारी धावपळ करत असताना महापालिकेने गाळे सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. उत्सव काळात अशा प्रकारची कारवाई करून अडवणूक करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला.