आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे स्टेशन पोलिस चौकी समोरील फुटपाथवर सोडा गाडीवर दारू विक्री करताना पोलिसांनी कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना अरेरावी करून दमदाटी करून शासकीय कामात आणल्यामुळे दोघांना दोन वर्षे शिक्षा झाली आहे.
रामप्रभू गुरुनाथ माने, सागर मारुती वळकुंबे (रा. दोघे सोलापूर) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी शिक्षा ठोठावली आहे. सदर बझार पोलिस स्टेशनच्या हद्दीत रेल्वे स्टेशन जवळ सोडा गाडीवर दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस हवालदार धायगुडे त्यांच्या पथकासह तिथे कारवाईसाठी गेल्यानंतर दोघांनी त्यांना अंगावर येऊन शिवीगाळ दमदाटी केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून फिर्याद देण्यात आली होती. फौजदार अल्फाज शेख यांनी तपास करून दोषारोपपत्र पाठवले होते. पाच साक्षीदार तपासले. हा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील जी. आय. रामपुरे व रजनी बुजरे या वकिलांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून एम. जी. कोटाणे यांनी काम पाहिले.
सहायक पोलिस निरीक्षकाला धक्काबुक्की, ट्रकचालकाला एक वर्ष शिक्षा सहायक पोलिस निरीक्षकाला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोहम्मद तस्लीम रहेसूल जामाखान या ट्रकचालकाला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी हा निकाल दिला. सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी विजापूर नाका पोलिसात तक्रार दिली होती. ८ ऑक्टोबर २०२० रोजी जड वाहतूक नियोजन सुरू होते. त्यावेळी टँकर (जीजे १६ एयू ७०५३) चालकाने भरधाव वेगात कट मारून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला थांबवल्यानंतर एपीआय पाटील यांना धक्काबुक्की करून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. फौजदार एम. एस. बेंबडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते. हा गुन्हा सिद्ध झाला. एक वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सहा साक्षीदार तपासले. यात सरकारी वकील जी. आय. रामपुरे, रजनी बुजरे या वकिलांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून हवालदार व्ही. ए. कोकणे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.