आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात कला शिक्षक संघटन आक्रमक:कला, क्रीडा, नाट्य परीक्षांचे अर्ज छाननीचे अतिरिक्त शुल्क रद्द करा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रीय कला, चित्रकला, क्रीडा प्रकारात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतात. तसा प्रस्ताव शाळा व महाविद्यालया कडून विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवण्यात येतो. त्याची छाननी करण्यासाठी रोजंदारी कर्मचारी अतिरिक्त लागतात, त्यासाठी प्रति विद्यार्थी 50 शुल्क आकारण्यात यावे, तसे प्रस्ताव पाठवावेत असे पुणे शिक्षण मंडळाकडून पत्राद्वारे कळवले आहे. त्यावर कला शिक्षक संघटना रोष व्यक्त करीत आहेत.

दहावी व बारावी परीक्षांमध्ये शास्त्रीय कला (गायन,वादन नृत्य),चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या व लोककला, खेळाडू, एनसीसी, स्काऊट व गाईड प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्या साठीचे प्रस्ताव शाळांकडून विभागीय मंडळांना प्राप्त होता. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक प्रस्तावाची छाननी करावी लागते.

प्रस्तावाची छाननी केल्यानंतर प्रस्तावांमध्ये त्रुटी असतात, त्या संबंधित शाळा,कनिष्ठ महाविद्यालय यांच्याशी पत्र व्यवहार करुन त्रुटींची पूर्तता करुन घ्यावी लागते. यादी अंतीम केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रेडनुसार गुण देण्याची कार्यवाही केली जाते. दरवर्षी वाढती संख्या लक्षात घेता प्रस्तावाच्या छाननी कामासाठी जास्तीचे कर्मचारी लागत आहेत. तरी फेब्रुवारी- मार्च 2023 पासून प्रती विद्यार्थी 50 रुपये शुल्क घ्यावेत. असे बोर्डाकडून कळवले आहे.

चित्रकला, शास्त्रीय कला, क्रीडा, स्काऊट इ. मध्ये विद्यार्थी अभ्यासाबरोबर यश संपादन केले तर त्या गुणासाठी प्रस्ताव जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना पन्नास रुपये भरा. असे शिक्षण मंडळाने पत्र काढले आहे. ते चुकीचे आहे. लवकर ते परिपत्र रद्द करण्यात यावे.या परिपत्रकामुळे पालक, कलाशिक्षक, क्रीडाशिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात गोंधळाचा वातावरण सुरू झाले आहे. जुन्या पद्धतीनेच विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण द्यावेत असे शैक्षणिक कला शिक्षक संघाच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी अनिल रॉय, संतोष धारेराव, विजयश्री बिराजदार,शांतप्पा काळे उपस्थित होते.

शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे कलाप्राविण्य व शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा देणाऱ्यांचे अर्ज छाननीसाठी अतिरिक्त पन्नास रुपये शासन (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे) आकारणी करणार आहे. काही विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले असतात. ते शासकीय चित्रकला परीक्षेची ही फी भरू शकत नाहीत. याचे लेखी निवेदन शिक्षक आमदार जयंत आसगांवकर व शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना दिले. ही माहिती अध्यक्ष दीपक कन्ना यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...