आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाईक परीक्षा केंद्रातर्फे संकेतस्थळावर तारखा‎:मार्च, एप्रिल, मे महिन्यांत‎ तब्बल 18 सीईटी होणार‎

सोलापूर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सीईटी‎ सेलतर्फे मार्च ते मे या कालावधीत‎ तब्बल १८ अभ्यासक्रमांच्या सीईटी‎ म्हणजे प्रवेश परीक्षा होणार आहेत.‎ याच्या तारखा सीईटी सेलने‎ संकेतस्थळावर जाहीर केल्या‎ आहेत. केवळ अभियांत्रिकीच नाही,‎ तर महाराष्ट्र सीईटी सेलकडून‎ फार्मसी, कृषी, बीएड व इतर‎ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या‎ सीईटी होतात. या परीक्षांच्या आधारे‎ पदवी, पदव्युत्तर पदवी‎ अभ्यासक्रमांचे प्रवेश होतात.‎ स्टेट सीईटी सेल २०२३ परीक्षा‎ पॅटर्न , सेक्शन, अवधी, प्रश्नांचे‎ प्रकार, एकूण गुण, गुणांकन आदी‎ सीईटी सेलच्या संकेतस्थळावर‎ देण्यात आले आहेत.

परीक्षार्थींनी‎ सीईटी अभ्यासक्रमाचे अवलोकन‎ करावे. राज्यात ९ ते १३ मे या‎ कालावधीत अभियांत्रिकी‎ प्रवेशासाठी अनिवार्य असलेली‎ सीईटी घोषित केली आहे. पीसीबी‎ ग्रुपसाठीची सीईटी परीक्षा १५ ते २० मे‎ या कालावधीत होणार आहे. विद्यार्थी‎ विविध परीक्षांची नावे संक्षिप्त‎ पद्धतीने बोलतात. त्या परीक्षांची‎ विस्तारित नावेही सीईटी सेलद्वारे‎ जारी करण्यात आली आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...