आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रदान:सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 318 जणांनी केले 636 बुबुळांचे दान

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा अंधत्व निवारण समितीकडून सध्या शाळा, महाविद्यालयांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती केली जात आहे. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील ३१८ जणांनी ६३६ बुबुळ दान केले. त्यातून ३६८ जणांना दृष्टी मिळाली. दानशुरांनी केलेल्या नेत्रदानातून दिव्यांगाच्या जीवनातील अंधार दूर करत त्यांना सृष्टी पाहता आली. या दातृत्वाने २०५ पुरुष व १६३ महिलांना नव्याने दृष्टी प्राप्त झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग व सोलापूर जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यांच्याकडून नेत्रदानाविषयी जनजागृती केली जात आहे. नियंत्रण समितीकडून वर्षभर नेत्रदान करणाऱ्यांची नोंदणी करुन घेतली जात आहे. कोरोनामध्ये नेत्रदान चळवळी पूर्णता थंड झाली होती.

बातम्या आणखी आहेत...