आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कार्तिकी यात्रा काळात पंढरपूर येथे तब्बल 58 संशियत चोरटे जेरबंद

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिकी यात्रा काळात पंढरपूरमध्ये भाविकांच्या वस्तू चोरी करणाऱ्या ५८ संशयितांवर कारवाई केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखा पंढरपूर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व परिसरातील इतर स्थानिक गुन्हे शाखेचे वारकरी वेशभूषेतील १० पथके तयार केली होती.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण फुगे, सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा पंढरपूर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व परिसरातील इतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...