आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:आश्रम शाळेस 25  आसनी स्कूलबस

सांगोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजापूर येथील सुंदर आश्रमशाळेत पुणे येथील उद्योजक अशोक मुसळे यांनी २५ आसनी स्कूल बस भेट दिली. सात-आठ किलोमीटरवरील विद्यार्थ्यांची या बसमुळे सोय होईल, त्यांच्या शिक्षणाला गती येईल. टाटा मार्कापूर ही नवीन २५ आसनी स्कूल बस भेट दिली आहे. तिची अंदाजे २० लाख रुपये किंमत होते. शाळा परिसरातील आठ ते दहा किलोमीटर परिसरातील रोज शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बसचा मोफत प्रवास होईल.

या बसला जीपीएस सिस्टीम आहे.पुणे येथील उद्योजक अशोक मुसळे यांच्या मनोप्रेम ट्रस्टकडून टाटा कंपनीची मार्कोपोलो स्कूल बस राजापूर (ता. सांगोला) येथील सुंदर आश्रमशाळेस देणगी म्हणून केली. या वेळी मनोप्रेम ट्रस्टचे विश्वस्त, सॉलिड्स हायटेकचे व्यवस्थापकीय संचालक वैभव मुसळे, सारिका पांढरे, सुनील गडदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...