आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यास सांगा, दवंडीने जागृती करा ; गृहभेटीद्वारे जनजागृती मोहीम राबवा

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पण, केंद्र व राज्य शासनाने खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घ्यावी, प्रतिबंधात्मक उपायोजनांची पुन्हा सवय व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना आहेत. त्यासंदर्भात दवंडी देणे, आरोग्य विभागास घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचे आदेश दिल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. श्री. स्वामी म्हणाले,“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग खूप बाधित झालेला होता. काही दिग्गज मान्यवरांसह, अनेकांच्या परिवारातील महत्त्वाच्या व्यक्ती कोरोनामुळे आपल्यापासून हिरावल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामीण भागात मास्कचा वापर वाढविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. गावची चावडी, बाजारपेठा आदी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याबाबत लोकांना आवाहन करण्यात येत आहे. दवंडी देण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर सुरू करावा. आरोग्य विभागतर्फे ‘हर घर दस्तक’ अभियान सुरू केले आहे. घरोघरी जाणाऱ्या आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना व्यवस्थित माहिती द्यावी. यापूर्वीचे अनुभव वाईट आहेत. लोकांच्या सेवेसाठी अव्याहत राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार नागरिकांनी करू नये, असे आवाहन स्वामी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...