आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला व बालकल्याण मंत्रालय विभागाच्या वतीने शाळकरी मुलींना मासिकपाळीसाठी दिले जाणारे सॅनिटरी पॅडच्या अस्मिता योजनेला जिल्ह्यात घरघर लागली आहे. गेले अनेक महिने ही योजना शाळकरी मुलींपर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे अस्मिता योजनेचे तीन तेरा वाजले आहेत, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
पंकजा मुंढे यांनी महिला व बाल कल्याण मंत्री असताना जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलींना मासिक पाळीच्या संदर्भात मी स्वच्छतेचे महत्व स्पष्ट समजावून अस्मिता कार्ड देऊन महिन्याला 5 रूपयात सॅनिटरी पॅड देण्याची 2015 पासून ही योजना तयार करण्यात आली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही योजना असूनही या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.
अनेक महिने पॅड दिलेच नाही
कोरोना काळात तर या शाळकरी मुलींना कोणत्याही प्रकारचे सॅनिटरी पॅड देण्यात आले नाहीत. शिवाय कोरोना काळ संपल्यानंतरही शाळा सुरू झाल्यावर या योजनेचा लाभ मुलींना झाला नाही. कारण या योजनेच्या माध्यमातून वाटप केले जाणारे सॅनिटरी पॅड निर्मिती आणि वितरणाचे काम ठप्प झाले. त्यामुळे मुलींना अस्मिताचे कार्ड असूनही त्यांना याचा लाभ मिळाला नाही.
अशी आहे आकडेवारी
अक्कलकोट - 2638
बार्शी - 1270
करमाळा - 1293
माढा - 1271
माळशिरस - 2743
मंगळवेढा - 713( ब)
मंगळवेढा - 370
मोहोळ - 2084
पंढरपूर - 811
सांगोला - 447
सांगोला (ब गट) - 825
उत्तर सोलापूर - 663
दक्षिण सोलापूर - 2014
एकूण लाभधारक - 17142
कित्येक महिने आम्हाला लाभ नाही
कित्येक महिन्यांपासून आम्हाला सॅनेटरी पॅड मिळालेली नाही. शिवाय त्या योजनेबद्दल कोणी काही बोलतही नाही. त्यामुळे कार्ड जवळ ठेवून केवळ वाट बघत आहोत तेव्हा योजना सुरू होईल आणि केव्हा वाटप होईल याबाबत कुणीच काही सांगत नाही, असे लाभधारक कन्या सानिया मुल्लाने सांगितले.
सध्या वाटप थांबले आहे
सध्या इतर काही गोष्टींचे अपडेटेंशन सुरू असल्यामुळे अस्मिता कार्डच्या माध्यमातून मुलींना दिले जाणारे सॅनिटरीपॅड शाळेपर्यंत पोहोचवता आले नाही. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे जिल्हा समन्वयक अस्मिता योजनेचे अवधूत देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.