आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांमुळे आतापर्यंत १५ जण जखमी:एप्रिलमध्ये डांबरीकरण केले ; ४ महिन्यांत पुन्हा खड्डे पडले

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात सम्राट चौक रस्ता ड्रेनेज लाइनच्या कामासाठी खोदला, दोन वर्षांनंतर तेथे डांबरीकरण केले गेले. पण चार महिन्यातच रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला. या खड्ड्यामुळे वाहने घसरून पडल्याने जवळपास १५ तेथे जखमी झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.

सम्राट चौक ते रूपाभवानी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या तीन वर्षांपासून खड्डेच खड्डे आहेत. रस्ता सातत्याने ड्रेनेज लाइनच्या कामासाठी खोदला जाण्याची जणू परंपराच महापालिकेने सुरू केली आहे. रस्ता खोदायचा आणि निकृष्ट पध्दतीने डांबरीकरण करायचे आणि रस्ता पुन्हा खड्ड््यात असे चित्र दिसत आहे. आता तर पावसाळ्यामुळे सम्राट चौक ते चंडक पॉलिटेक्निकच्या प्रवेशद्वारापर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डयात पाणी साठले आहे. त्यातच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाचे मोठ मोठे ढीग आणून टाकले आहेत. मुरुम भिजला आणि तो रस्त्यावर पसरल्याने रस्ता निसरडा झाला. या रस्त्याच्या कडेला अनेक घरे आहेत. रहिवाशी वसाहत आहे. तेथील एका महिलेने सांगितले की, या ठिकाणी गेल्या आठ दिवसांत १५ ते २० जण घसरून पडले आहेत. एक मुलगी घसरून पडली, एक ज्येष्ठ नागरिकही घसरून पडले. त्यांना आम्ही उठवून, त्यांना वाहनासह व्यवस्थित जाण्यासाठी मदत केली. मनपाच्या अधिकाऱ्यांना, येथील माजी नगरसेवकांनाही हे सांगितले पण त्यांनी काहीच लक्ष दिलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...