आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कारांविना शिक्षणाचे महत्त्व शून्य:शाहीन अकॅडमीचे संचालक आसिफ अली यांचे प्रतिपादन

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावी पिढीला शिक्षणासोबतच संस्कार देणे महत्त्वाचे आहे. संस्कारांशिवाय शिक्षणाला काही महत्त्व नाही. आजच्या मुलांना मोबाइल आणि इंटरनेटच्या संस्कृतीतून बाहेर काढून चांगले संस्कार देणे गरजेचे आहे, असे मत शाहीन अकॅडमी, बीदरचे संचालक आसिफ अली यांनी व्यक्त केले.

अांतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचे औचित्य साधून शाहीन अकॅडमी बीदर व खादिमाने उर्दू फोरम सोलापूरच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सातवी उर्दू माध्यम विद्यार्थ्यांसाठी अकॅडमिक अतिदक्षता केंद्र सुरू करण्यात आले. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ज्ञानाबरोबर, आत्मविश्वास, अनुशासन व आदर असल्यास उत्कृष्ट नागरिक घडविण्यासाठी मदत होईल. शाहीनने मागच्या पंधरा वर्षात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली व असंख्य गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठीचा मार्ग सुकर केला.

सहसचिव महेमूद नवाज यांनी स्वागत केले. संचालक अ. मन्नान शेख यांनी फोरमच्या कार्याचा तपशील प्रस्तुत केला. नासिर आळंदकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कोविड काळात विद्यार्थ्यांसाठी या केंद्राची सुरुवात करण्यात आली. येथे मोफत शिक्षण दिले जाणार आहे. बेगम पेठ येथील फोरमच्या कार्यालयात व नई जिंदगी येथील शमा स्कूलमध्ये वर्ग सुरू राहील. या क्रॅश कोर्समध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत संगणक कोर्स व स्पोकन इंग्रजी कोर्स दिला जाईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली. को-ऑर्डिनेटर रफिक खान यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...