आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:घोडा तांडा येथे मुलास मारहाणीत दात पडले; एका युवकावर गुन्हा दाखल

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाेडा तांडा येथे विनाकारण मुलाला मारहाण केल्याने त्याचे दोन दात पडल्याची तक्रार अनिता सुरेश चव्हाण (वय ३५, रा. घोडा तांडा ) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. तक्रारीवरून समीर रवी चव्हाण (वय ३० , रा. घोडातांडा) याच्यावर गुन्हा दाखल झाला.

मुलगा राहत्या घरासमोर कट्ट्यावर बसला असता समीर याने विनाकारण मुलाच्या चेहऱ्यावर बुक्की मारली. समोरील दोन दात पडले व दोन दात हलत आहेत. या घटनेची विचारणा करण्यास गेल्यानंतर शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...