आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनभावनेची दखल:अखेर शमी वृक्ष अतिक्रमणातून मुक्त; भक्तांसाठी पालिका करतेय नियोजन

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्क स्टेडीयमच्या बाजूचा पुरातन शमी वृक्ष अखेर अतिक्रमणमुक्त झाला आहे. परिसरातील खोकी, लोखंडी सांगाडे महापालिकेने काढले आहेत. विजयादशमीदिवशी येणाऱ्या भक्तांसाठी महापालिकेकडून सोयीसुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.चार हुतात्मा पुतळ्यांच्या बाजूने भाविकांना प्रवेश देण्यात येईल आणि पत्रकार संघाच्या बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग असेल. याबाबत नियोजन करण्यासाठी पालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी शमी वृक्ष परिसराची पाहणी केली.

शमी वृक्ष परिसरातील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी मध्यवर्ती नवरात्रोत्स मंडळाचे दत्तात्रय मेनकुदळे यांनी आंदोलन केले. त्यानंतर अतिक्रमण काढण्याच्या कामाला गती आली. तेथील अतिक्रमण हटवण्यात आले. दसऱ्याच्या दिवशी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी शनिवारी पाहणी केली.

सीमोल्लंघनादिवशी देवीभक्तांना धार्मिक विधी करण्यात सुविधा व्हावी, त्या ठिकाणी होणारी गर्दी ध्यानात घेऊन तेथे काहीही गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. शमी दर्शनासाठी चार हुतात्मा पुतळ्याच्या बाजूने देवीभक्त प्रवेश करतील तर पार्क चौक येथील पत्रकार संघाच्या बाजूने ते बाहेर पडतील, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...