आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:ठोकळ प्रशालेच्या अथर्वचा होणार राज्यपालांच्या हस्ते गौरव

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा स्काऊट आणि गाइड्स संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कार चाचणी शिबिरात निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील सात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला. स्काऊट आणि गाइड्स शहर-जिल्हा कार्यालय येथे चाचणी शिबिर घेण्यात आले. या राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये विशाल जेटगी, मयूर बिराजदार, करणतेजा चलवादी, तुळजारामसिंग तोवर, आर्यन जगताप, अरमान शेख, अनुपम ढवळसंक यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निर्मला ठोकळ, संस्थेचे अध्यक्ष विपिन ठोकळ, उपाध्यक्ष सचिन ठोकळ, सचिव भिकाजी गाजरे, संचालिका शिल्पा ठोकळ यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डी. डी. गाजरे व शिक्षक अर्जुन सुरवसे, पूनम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सात विद्यार्थ्यांना पुरस्कार, राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रमाणपत्रे
प्रशालेच्या सात विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून, त्यांना राज्यपालांची स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे दिली जातील. एका विद्यार्थ्यास प्रातिनिधिक स्वरूपात विधान भवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतो. निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या अथर्व मच्छिंद्र सपताळे या विद्यार्थ्यास राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...