आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैराग बसस्थानकात शनिवारी दुपारी झाली मारहाण:कॉलेज तरुणावर तलवारीने हल्ला, सहा जणांविरोधात गुन्हा

वैराग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तू आमच्याकडे का बघतोस, या कारणावरून दोघांना सहा जणांनी तलवार, लोखंडी रॉडने मारहाण केली. वैराग बसस्थानकात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित आरोपी नागेश उर्फ नागनाथ भानुदास खेंदाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

यातील युवक गंभीर जखमी असून, बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, महाविद्यालयात शिकत असलेला शेखर दादासाहेब मोरे हा कॉलेजवरून एसटीने वैराग बसस्थानकात आला, असता त्याला तू आमच्याकडे का बघितले या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करून जखमी केले. लोखंडी रॉड आणि लाथा बुक्क्याने चुलत भावासह मारहाण केली. जखमी झालेल्या शेखर मोरे यास बार्शीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये नागेश खेंदाड, अक्षय पवार, आनंद खेंदाड, आदित्य ढेकळे, राहुल खेंदाड, अतीम सय्यद, अशा सहा जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली. तपास पोलिस निरीक्षक विनय बहिर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...