आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:शिवसंग्राममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू ; प्रदेशाध्यक्ष सावंत यांचा शिंदेसेनेवर थेट आरोप

साेलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे पक्षाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी केल्याचा आराेप संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी केला. फूट पाडण्याचे उद्योग सुरूच राहिले तर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदे यांनी सांगितले की, सामंत यांनी शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी शिंदेसेनेत येत असल्याची खोटी माहिती माध्यमांना दिली. सामंतांसोबत बसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये केवळ एकच पदाधिकारी शिवसंग्रामचा होता. मात्र, कोणतीही खतरजमा न करता त्यांनी शिवसंग्रामचे पदाधिकारी असल्याचे सांगितले होते. शिवसंग्राम संघटना ही २०१४ पासून भाजपसोबत घटक पक्ष म्हणून काम करते आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा मंत्री शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मित्रधर्म पाळत नाहीत, असाच याचा अर्थ हाेताे. अशा प्रकारचे काम सुरू राहिले तर ते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. शिवसंग्रामचे कार्यकर्ते नसतानादेखील मंत्री सामंत त्यांचा परिचय शिवसंग्रामचे कार्यकर्ते म्हणून देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...