आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नियोजन समिती, कार्यकारी समितीची बैठक सोमवारी (दि. १३) सकाळी साडे अकरा वाजता घेण्यात येणार आहे. बैठकीला आता केवळ खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे नव्याने घेण्यात आलेल्या २० सदस्यांना उपस्थित राहता येणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य २७, महानगरपालिकेचे ९ नगरसेवक, जिल्ह्यातील नगरपालिकेत नगर परिषदेच्या नगरसेवकांतून ४ असे ४० सदस्य होते. परंतु या सर्वांच्या मुदती संपल्याने त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बसता येणार नाही. त्यामुळे नव्याने निवड झालेल्या २० सदस्यांना बैठकीत उपस्थित राहता येईल.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन येथे होईल. मागील बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना, ३१ मार्च २०२२ अखेरच्या खर्चाला मान्यता देणे, २०२२-२३ साठी योजनानिहाय व यंत्रणानिहाय अर्थसंकल्पित तरतूद याबाबत चर्चा होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.