आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Aurangzeb's Tomb Should Be Removed And Chhatrapati Sambhaji Maharaj's Memorial Should Be Built; Shiv Sena District Chief Purushottam Barde's Demand To The Chief Minister

औरंगजेबाची कबर हटवून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधावे:ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रूरकर्मा औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत हाल हाल करून मारले. त्यामुळे शासनाने औरंगजेबाची औरंगाबाद येथील कबर हटवून त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधावे आणि आपले हिंदुत्व सिद्ध करावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला दिले आहे.

व्हिडीओ तयार करत मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी औरंगाबाद येथील धर्मांध मुघल शासक औरंगजेब याच्या कबरीची पाहणी केली. कबरीच्या शेजारूनच एक व्हिडिओ प्रसारित करत जिल्हाप्रमुख बरडे यांनी ही मागणी केली आहे. बरडे म्हणाले, ज्याने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना अत्यंत क्रूरपणे ठार मारले त्या मुघल शासक औरंगजेबाची कबर सजवलेली पाहून मन अत्यंत उद्विग्न होत आहे. औरंगजेबाने आपले वडील, आपला भाऊ, मुले यांना ठार मारले. कहर म्हणजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचीही अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

शंभूराजांचे स्मारक करावे - बरडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सरकार हिंदुत्ववादी असल्याचे सांगतात. हे सरकार जर खरेच हिंदुत्ववादी असेल तर त्यांनी क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटवून तेथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक करावे. औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज नगर आम्हीच केल्याचा दावा शिंदे फडणवीस सरकारकडून सातत्याने करण्यात येत आहे. या सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी औरंगजेबाची कबर हटवून तिथे शंभूराजांचे स्मारक करावे असेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले.

कोण आहे बरडे?

बरडे हे सोलापूरचे कट्टर शिवसैनिक आहेत. विभाग प्रमुख ते जिल्हाप्रमुख या प्रवासात ते निष्ठेने पक्षासोबत उभे राहिले आहेत महाराष्ट्रात शिवसेनेची पडझड झाली तरी त्यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हीच आपली खरी शिवसेना असल्याचे सांगितले त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पक्षाची फार काही पडझड झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...