आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Authorize Slums Before 2019, Be Tough To Prevent Dalit Atrocities; Raja Sarvade's Statement On The Demands Of RPI Athavale Group |marathi News

मागणी:2019 आधीच्या झोपड्या अधिकृत करा, दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर व्हा; आरपीआय आठवले गटाच्या मागण्यांचे राजा सरवदे यांनी दिले निवेदन

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजा सरवदे यांनी दिला.

पूनम गेट येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत पक्षाचे झेंडे व विविध मागण्यांची फलके घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. डी. कांबळे, शहर अध्यक्ष अतुल नागटिळक, श्याम धुरी, सुशील सरवदे, शिवा उबाळे, लक्ष्मण रणधिरे, सुमित शिवशरण, प्रणव लोंढे, उत्तर विधानसभा अध्यक्ष दावला सुर्वे, पंकज ढसाळ, महेश पवार उपस्थित होते.

निवेदनाद्वारे करण्यात आल्या या प्रमुख मागण्या
राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडपट्टीवासीयांची झोपड्या अधिकृत कराव्यात. राज्य सरकारने नोकरीतील मागासवर्गीयांचा अनुशेष त्वरित भरावा. अनुसूचित जाती-जमातीच्या मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावेत. भूमिहीनांना कसण्यासाठी पाच एकर जमीन देण्यात यावी. गॅस, पेट्रोल, डिझेल इत्यादीवर नियंत्रण आणावे. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण लागू करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला आरक्षण लागू करावे. सोलापूर शहरातील व हद्दवाढ भागातील मनपाने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा. जिल्ह्यातील वन खात्याने फॉरेस्ट जमिनीवरील अतिक्रमण काढून मूळ मालकांना जमीन परत करावी.

बातम्या आणखी आहेत...