आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

118.50 टक्के पावसाची नोंद:ओलांडून सरासरी, पाच वर्षांत विक्रमी सरी

विठ्ठल सुतार | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याचे ९० दिवस पूर्ण झाले. सरासरीच्या ११८.५० टक्के (३६८.२० मिमी) पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. मागील पाच वर्षात ऑगस्टपर्यंत या वर्षी सर्वाधिक पाऊस झाला आहे. जून महिन्यात सरासरीच्या ७८ टक्के, जुलै महिन्यात १५६ टक्के तर ऑगस्टमध्ये सरासरीच्या ९३ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात पावसाने १८ दिवस विश्रांती घेऊनही सरासरी ९३ टक्के राहिली आहे. आतापर्यंत करमाळा तालुक्यात सर्वाधिक ४३२.७० मि.मि. (१४९ टक्के) तर सर्वात कमी सांगोला तालुक्यात २०५.२० मि.मि. (७४ टक्के) नोंद झाली आहे.

अपेक्षेपेक्षाही सर्वाधिक
जून महिन्यात १०२ मिमी अपेक्षित असताना ८७ मिमी, जुलै महिन्यात ९४ मिमी अपेक्षित असताना १५६ मिमी तर ऑगस्ट महिन्यात ९८.४० मिमी अपेक्षित असताना १०० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ३१० मिमी पाऊस अपेक्षित होता, त्या तुलनेत जिल्ह्यात ३६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात व ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही तीन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

पुणे विभागात ८९ टक्के पाऊस...: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत ६९७ मिमी (८९.५० टक्के) पाऊस झाला. जून ८४.९० मिमी (४२.७० टक्के) जुलै ३४८.४० मिमी (१०६ टक्के) आॅगस्ट महिन्यात २४७ मिमी अपेक्षित, प्रत्यक्षात २३९ मिमी. पाऊस झाला.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
उ. सोलापूर ५२१.९०, १३७.५० %, द. सोलापूर ३८२.७०, १०६%, बार्शी ४९४.२०, १३६.८०%, अक्कलकोट ४८१.४०, १२८.३०%, मोहोळ ३२९.५०, ११४.३०%, माढा ३२६.३०, १०६.३०%, करमाळा ४३२.७०, १४९%, पंढरपूर ३०३.८०, ९८.९०%, सांगोला २०५.२०, ७४%, माळशिरस ३४७.२०, १२६.५०%, मंगळवेढा २६७.८०, १०३.६०% एकूण ३६८.२०, ११८.५०%

बातम्या आणखी आहेत...