आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा हाेटगी रस्त्यावर सुसज्ज अशा विमानतळावरून नागरी सेवा मिळत नाही, विकासाच्या प्रश्नावर नेतेमंडळी काेणी बाेलत नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी अर्जुन रामगीर या ७२ वर्षीय ज्येष्ठाने साेलापूर ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा सुरू केली. शुक्रवारी ते मुंबई मार्गाकडे प्रस्थान ठेवले. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून बाेरामणीच्या नियाेजित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. शिर्डी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनलला ५२७ काेटी, संभाजीनगर विमानतळाच्या भूसंपादनाला ७०० काेटींची तरतूद करण्यात आली. परंतु नियाेजित बाेरामणी विमानतळाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून हे विमानतळ रखडले.
दुसरीकडे हाेटगी रस्त्यावरील विमानतळावर २५ काेटींचा खर्च झाला. सर्व सुविधा देण्यात आल्या. परंतु नागरी सेवा अद्याप सुरू हाेत नाही. त्याबाबत लाेकप्रतिनिधी बाेलत नाहीत. याचा आत्मक्लेष म्हणूनच ही यात्रा असल्याचे श्री. रामगीर म्हणाले. श्री. रामगीर यांच्या आत्मकलेष पदयात्रा आरंभाला उद्याेजक गणेश पेनगोंडा, केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, अनंत कुलकर्णी, आनंद पाटील, गणेश शिलेदार, रमेश खुने, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, जगदीश गुर्जर, विजय जाधव आदी उपस्थित हाेते.
सोलापूर विकासाची रामगीरांना आस्था
व्यवसायाने टेलर. अर्जुन टेलर या नावाने आेळखले जातात. साेलापूरच्या विकासाविषयी प्रचंड आस्था. काही तरी करण्याची नेहमीच धडपड. हाेटगी रस्त्यावरील विमानतळ येथून नागरी सेवा मिळावी, यासाठी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पायी निघाले.
सामान्य माणूस पुढे येण्यासाठी निर्णय
कुठलाही माेठा प्रकल्प मिळत नाही, राेजगारनिर्मिती नाही, शिकलेली तरुणाई पुणे-मुंबईचा रस्ता धरते. ही आैद्याेगिक पीछेहाट साेलापूरला अधाेगतीकडे नेणारी आहे. विकासाच्या मुद्द्यावर सामान्य माणूस पेटून उठला तरच शासन जागे हाेईल, याची मला खात्री आहे. त्यासाठीच वयाचा विचार न करता या यात्रेला सुरुवात केली.- अर्जुन रामगीर, साेलापूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.