आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठिंबा:विमानसेवा ; चक्री उपाेषणाला मुस्लिम संघटनांकडून पाठिंबा

साेलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाेटगी रस्त्यावरील विमानतळावरून नागरी सेवा मिळण्यासाठी सुरू झालेल्या चक्री उपाेषणाला साेमवारी मुस्लिम संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला. साेमवारी आंदाेलनाचा १६ वा दिवस हाेता. सोशल उर्दू शाळेचे मुख्याध्यापक प्रा. आसिफ इक्बाल यांनी हिंदी शायरींवर घोषणा दिल्या. त्यांच्या समवेत विद्यार्थीही सहभागी झाले हाेते.

कादरिया अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महिबूब कादरी, फेरोज जमादार, अझहर नदाफ, गौस नदाफ आदी हाेते. माजी सैनिक गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष गंगाधर कोडगे स्वामी, वैष्णवी फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर शहा, जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे संचालक, माजी शिक्षक आमदार प्रा. दीपक सावंत यांनी सक्रिय पाठिंबा दिला.

विमानसेवा प्रत्येकाचा मूलभूत अधिकारच
विमानसेवा हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाला त्यापासून कुणालाच वंचित ठेवता येत नाही. परंतु त्यासाठी लाेकांना रस्त्यावर यावे लागते, यापेक्षा अधिक दुर्दैवाची गाेष्ट नाही. या लाेकलढ्याला निश्चित यश येईल.-नरसिंग मेंगजी, माजी आमदार

बातम्या आणखी आहेत...