आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवदारे प्रतिष्ठान:विघातकता टाळा अन्यथा अराजकता ; चौसाळकर यांनी व्यक्त केली चिंता

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचा हिंदुत्ववाद आणि घटनेचा सरनामा हे मुद्दे सातत्याने समोर येत आहेत. लव्ह जिहाद, बुलडोझर संस्कृती, नागरिकत्व कायदा, मॉब लिचिंग आणि मोकाट गोरक्षक यांच्यामुळे होणाऱ्या घटना लोकशाहीला हानिकारक आहेत. ते रोखले नाही तर देशात आराजकता माजेल, अशी भीती ज्येष्ठ विचारवंत व राज्यशास्त्राचे अभ्यासक अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केली. बुधवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात वि.गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जीवन गौरव पुरस्काराचे वितरण चौसाळकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्यांनी ‘अमृतमहोत्सवी भारत’ या विषयावर विचार मांडले. याप्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्यासह पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे नरेंद्र गंभीरे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी चौसाळकर म्हणाले,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीबद्दल वेगवेगळी मते असली तरी त्यांनी देशाचा आर्थिक स्तर चांगला राखला आहे. जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था सध्या पाचव्या क्रमांकावर असून कोरोना आणि नोटा-बंदी झाली नसती तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची भारताची अर्थव्यवस्था राहिली असती. पुढील २५ वर्षे भारताचे भविष्य उज्ज्वल असून विकासाचे अनेक मार्ग खुले आहेत. सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्म समभाव टिकून ठेवला पाहिजे. ते पाळले नाही, तर सोव्हिएत रशिया सारखे देशाचे विभाजन होईल, अशी भीती चौसाळकर यांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन शुभदा उपासे यांनी तर बाहुबली दोशी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...