आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प १५ मार्च रोजी अधिसभा सभागृहाने नामंजूर केला. आता कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या याबाबतच्या निर्देशाची प्रतीक्षा विद्यापीठाला आहे. अद्याप याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. अर्थसंकल्प मंजूर होत नाही, तोपर्यंत विद्यापीठ प्रशासनाच्या खर्चावरही मर्यादा असतील.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्यांनी कुलपती कोश्यारी यांची भेट घेऊन कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अर्थसंकल्प का फेटाळला याची सविस्तर भूमिकाही कुलपती यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केली आहे. राज्यापाल हे आता सुधारित अर्थसंकल्प अधिसभेत मांडण्याची सूचना करू शकतात. अर्थसंकल्प मंजुरीचेही अधिकार राज्यपाल यांना आहेत.
अर्थसंकल्पाच्या संदर्भात राज्यपाल कार्यालयाकडून अद्याप काहीही कळवण्यात आलेले नाही. राज्यपालांच्या निर्देशानेच पुढील कार्यवाही होईल. डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू
जनआंदोलन करणार सुरू
अधिसभा सभागृहाने नामंजूर केलेले अर्थसंकल्प सभागृहासमोर पुन्हा मांडले जाईल किंवा राज्यपाल अर्थसंकल्प मंजूर करतील याबाबतचा कोणताही निर्णय त्या त्या पातळीवर होईल. त्यानुसार बैठक घेऊन भूमिका स्षष्ट होईल. मात्र सुटा संघटनेची कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी कायम आहे. कुलगुरू जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यत जनआंदाेलन सुरू असेल.
डॉ. हनुमंत आवताडे, सुटा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.