आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआताच्या युवतीने समाजात काय चालले आहे याचे भान देणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी आपली आहे. प्री-वेडिंगचं शूटिंग करण्यापेक्षा किंवा फोटोशूट करण्यापेक्षा प्री-वेडिंग कौन्सिलिंगची जास्त गरज आहे , असे मत पोलिस उपयुक्त डॉ. दीपाली काळे यांनी व्यक्त केले. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन सोलापूर शाखेच्या वतीने पद्मविभूषण कै. आवाबाई वाडिया पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे प्रमुख डॉ. श्रीकांत येळेगावकर , डॉ. जमादार , डॉ. विजया महाजन, डॉ. आयेशा रंगरेज आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे व्यवस्थापक सुगतरत्न गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी विजया महाजन यांनी लिंग भेदभावाची भावना बदलण्याची गरज असून समाजामध्ये ही करण्याचं काम केवळ सुज्ञ व्यक्तीच करू शकतात असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. येळेगावकर यांनी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या स्थापनेपासून आतापर्यतच्या कामकाजावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. आयेशा रंगरेज यांनी मानले.
यांचा झाला गौरव यावेळी दिव्या मराठीच्या पत्रकार अश्विनी तडवळकर , सामाजिक कार्यकर्त्या कविता चव्हाण, प्रसिद्ध उद्योजिका अनिता माळगे आणि रंजना अक्षंतल -महिमकर यांचा कै. आवाबाई वाडिया पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शाल ,श्रीफळ, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या आवाबाई वाडिया पुरस्कार वितरणप्रसंगी सत्कारमूर्तीसह मान्यवर. यांचा झाला गौरव यावेळी दिव्या मराठीच्या पत्रकार अश्विनी तडवळकर , सामाजिक कार्यकर्त्या कविता चव्हाण, प्रसिद्ध उद्योजिका अनिता माळगे आणि रंजना अक्षंतल -महिमकर यांचा कै. आवाबाई वाडिया पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शाल ,श्रीफळ, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या आवाबाई वाडिया पुरस्कार वितरणप्रसंगी सत्कारमूर्तीसह मान्यवर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.