आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी आक्रमक:राज्यपाल कोश्यारींचे धाेतर फेडणाऱ्याला सेनेकडून इनाम

साेलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी शनिवारी अनुद््गार काढले. त्याचे तीव्र पडसाद साेलापूर शहरात उमटले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काेश्यारी यांच्या प्रतिमेला ‘जाेडे माराे’ आंदाेलन केले. तसेच त्यांचे धाेतर फेडणाऱ्याला एक लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक हाेऊन रस्त्यावर उतरले हाेते.

कोश्यारी यांच्यासह भाजपचे प्रवक्ते सुधांशू तिवाडी यांनीही शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य केले. त्यांचीही प्रतिमा या वेळी फाडण्यात आली.‘काेश्यारी चले जाव’च्या घाेषणा दिल्या. उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन झाले. या वेळी जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, सुरेश जगताप, दत्तात्रय वानकर, लहू गायकवाड, संदीप बेळमकर, अमित भोसले, संताजी भोळे, अजय खांडेकर, अनिल कोंडूर आदी उपस्थित होते.

महाराजांना दुग्धाभिषेक
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चाैकात येऊन मूर्तीला दुग्धाभिषेक केला. त्यानंतर राज्यपाल काेश्यारी यांचा समाचार घेणारी भाषणे झाली. कोश्यारींना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही. त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप आहे. त्याचा उद्रेक झाला तर महाराष्ट्रभर आंदाेलने हाेतील. त्यामुळे त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केली. या वेळी जोतिबा गुंड, निशांत सावळे, संपन्न दिवाकर, रूपेश भोसले, अक्षय जाधव, मुसा अत्तार, बिरप्पा बंडगर, मयूर रच्चा आदी उपस्थित हाेते.

वाचाळवीर काेश्यारींना ताबडताेब हाकलून द्या
राज्यपाल काेश्यारी शिवद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहेत. महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल त्यांना आदर नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दलही त्यांनी असेच बेताल वक्तव्य केले होते. त्यांची ताबडताेब हकालपट्टी करा.’’-माऊली पवार, सकल मराठा समा

बातम्या आणखी आहेत...