आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या धावपळीच्या जीवनात माणूस आपल्या शरीराकडे लक्ष देत नसल्याने अनेक विकार जडत आहेत. ऋषीमुनींनी आयुर्वेदामध्ये निरोगी जीवन जगण्याचे विविध मूलमंत्र दिलेले आहेत. योगासने केल्याने निरोगी जीवन जगता येते हे सत्य आहे, असे प्रतिपादन डॉ.शिवरत्न शेटे यांनी केले. तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेप्रसंगी दुसरे पुष्प डॉ. शेटे यांनी गुंफले.
‘चला निरोगी जगूया'' हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवशीय व्याख्यानमाला आयोजिली आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, समाजसेवक विठ्ठल कदम, होटगीचे उत्तम पाटील, राजशेखर फताटे, सुभाष धुमशेट्टी,रेवणसिद्ध रोडगीकर यांच्यासह बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.
शरीर हे आपले मंदिर आहे. या मंदिररूपी देहाला आयुर्वेदाच्या पद्धतीने निरोगी राखणे हे आपले कर्तव्य आहे. स्वस्थ व्यक्तीने स्वतःच्या स्वास्थ्याचे रक्षण करावे आणि नंतर रोगी व्यक्तीने सुद्धा आपल्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या दिनचर्या आयुर्वेदानुसार असणे आवश्यक आहे. पाणी व अन्न प्रमाणात सेवन करावे. हे सांगत असताना पचन क्रियेवर होणाऱ्या परिणामाने कोणकोणते रोग होतात यासंबंधी माहिती डॉ. शेटे यांनी सांगितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.