आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बाप-लेक एकाच वेळी झाले बारावी पास ;सरपंच पत्नीच्या आग्रहाखातर वडिलांनी १७ नंबरचा फॉर्म भरला

कंदर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • }

कविटगाव ता. करमाळा येथील मुलगी आणि वडील एकाचवेळी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. सरपंच पत्नीच्या आग्रहाखातर वडिलांनी १७ नंबरचा फॉर्म भरला आणि मुलीबरोबर वडिलांनी बारावीची परीक्षा दिली. त्यात दोघेही उतीर्ण झाले. दोघांचेही कौतुक होत आहे. कविटगाव येथील शिवाजी सरडे (वय ४५) व त्यांची कन्या साक्षी शिवाजी सरडे (वय १७) हे दोघे बारावीत उत्तीर्ण झाले आहेत. शिवाजी सरडे हे कविटगाव येथील आणि साक्षी बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये विज्ञान शाखेत होती. सरडे यांना १९९७ मध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागली होती. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याची त्यांना खंत होती. यावर्षी बारावीत असणाऱ्या साक्षी व पत्नी विद्या सरडे यांच्या आग्रहामुळे त्यांनी कविटगाव येथे मच्छिंद्र नुस्ते विद्यालयात त्यांनी बहिस्थ विद्यार्थी म्हणून अर्ज भरला. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला, त्यात शिवाजी सरडे यांना ७० टक्के आणि साक्षीला ८६.५० टक्के गुण मिळाले आहेत. साक्षी ही मल्लखांब खेळातील राष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहे. पिता व कन्या सोबतच बारावी पास झाल्याबद्दल दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातम्या आणखी आहेत...