आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारंभ:बालाजी फाउंडेशनने वंचितांच्या मदतीसाठी दिली बोलेरो जीप भेट

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाड्यावस्त्यांवर गरिबांसाठी जाऊन प्रत्यक्ष समाज कार्य करणाऱ्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या शाखेत बालाजी फाउंडेशनने वंचितांची मदत करण्यासाठी बोलेरो जीप भेट दिली आहे. बालाजी अमाईन्स यांच्या बालाजी फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर आणि एस.व्ही.एस. मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ही बोलेरो जीप प्रदान करण्याचा समारंभ आसरा चौक येथील बालाजी अमाईन्सच्या कार्यालय परिसरात संपन्न झाला.

बोलेरो जीपची चावी फॅमिली प्लॅनिंगचे अध्यक्ष प्राचार्य के. एम. जमादार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी फॅमिली प्लॅनिंगचे खजिनदार डॉ. एन. बी. तेली, सचिव डॉ. आयेशा रंगरेज, डॉ. राजीव प्रधान , शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी व कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक फॅमिली प्लॅनिंग सोलापूर असोसिएशन शाखेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. राम रेड्डी यांचा सत्कार फॅमिली प्लॅनिंगचे कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव प्रधान यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...