आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन:तासगावमध्ये 26 रोजी होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी राजकुमार घोगरेंची निवड; स्वागताध्यक्षपदी सुभाष आर्वे

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त पाहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्यसंमेलनाचे 26 जून रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजन करण्यात आलेले आहे. तासगाव शहरातील नगरपरिषदेच्या संस्कृतिक भवनात पार पडणाऱ्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विचारवंत, सौत्रांतीक मार्क्सवादाचे अभ्यासक राजकुमार घोगरे यांची निवड केली आहे. तर स्वागताध्यक्षपदी सुभाष आर्वे यांची निवड झाल्याचे मुख्य संयोजन समितीतर्फे सांगण्यात आलेले आहे.

दि.26 व 27 जून या दोन दिवसीय साहित्यसंमेलनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्याच्या शोषणपिडणावर सांस्कृतिक, आर्थिक अश्या चौकस अंगाने चर्चा होणार असून देशभरातील अनेक विचारवंत यात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील बळीराजा साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी राज्य तसेच देश भरातून हजारोच्या संख्येने विचारवंत, कवी, साहित्यिक अन् शेतकरी बंधू आणि भगिणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक बालासाहेब रास्ते व समितीद्वारे करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...