आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके जमीनदोस्त:वादळी पावसात केळी व शेवगा पिके जमीनदोस्त ; शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान

पापरी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी ता. मोहोळ येथे बुधवारी ८ जून रोजी झालेल्या मृगाच्या पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने महादेव मंदिराकडील भागात केळी व शेवगा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. केळीचे धूड़ व शेवगा झाड़े वाऱ्याने जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान पापरी परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. उस, मका, डाळींब, बोर, सीताफळ, पेरू आदि फळ बागंना चांगला एका पाण्याचा आधार झाला आहे. मात्र सुलतान मुलाणी यांची वेणातूल चार एकर एकरातील साडे चार हजार केळी धुडापैकी तेराशे धुड जमीनदोस्त झाली.

बातम्या आणखी आहेत...