आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​युतीसाठी फडणवीसांनी ‘मातोश्री’वर यावे:मोदी, शहांचे बॅनर मोठे झळकले अन् बाळासाहेब, दिघेंना कोपऱ्यात लपवले- विनायक राऊत

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांचे मोठे बॅनर झळकले अन् बाळासाहेब, दिघेंना कोपऱ्यात लपवले असा घणाघात शिवसेना नेते विनायक राऊत यांनी करीत भाजप आणि, एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. नतदृष्ट भाजप, एकनाथ शिंदेविरोधी सारा महाराष्ट्र एकवटेल असे सांगत त्यांनी खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे. शिवसेनेसोबत युतीच करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांनी मातोश्रीवर या आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलावे. शिवसेनेचे दरवाजे कधीही बंद नाहीत असेही सुनावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहे, त्यानिमित्ताने खासदार राऊत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

कवाडेंचे आम्हाला समर्थन

ते म्हणाले, येत्या आठवड्यात आणखी मात्तब्बर शिवसेनेत येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थन दर्शवलं आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे.

गुलाबराव काहीही बोलत आहेत

राज्‍याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटायला वेळ देत नसल्‍याचे म्‍हणाले. यावर प्रतिक्रीया देताना खासदार राऊत म्हणाले गुलाबरावच्या बोलण्यात काही त‍थ्य नाही. ज्यावेळी आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना चहापाणासाठी वर्षा बंगल्यावर बोलावून घेत, त्‍यांच्‍याशी मनमोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा केली होती. तह करा असे म्हणणारे गुलाबरावच दुसऱ्याच दिवशी पळून गेले. त्या बैठकीत तुमच्यापैकी कोणाला व्हायचं असेल तर मी खुर्ची खाली करायला तयार आहे; असं सुद्धा उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

आम्हीच खरे

खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीलच आहे. त्यामुळे एकत्र यायचं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलावं. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी कायमच उघडे आहेत, असेही खासदार राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले.

शिंदे गटात भ्रमनिरास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दोन दिवसांपूर्वीच अक्कलकोटचे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी प्रवेश केला. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत ते स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परत आले आहेत. खासदार विनायक राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. शिंदे गटात गेलो आणि आपला भ्रमनिरास झाला,

महाराष्ट्राचा विकास फक्त उद्धव ठाकरे हेच करू शकतात आणि त्यांना शिवसैनिकांनी साथ देण्याची हीच खरी वेळ आहे, त्यामुळे पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे बुक्कानुरे यांनी सांगितले.

शिंदेंचे खरे रुप दिसले

गोविंदा आरक्षण आणि ठाण्यातल्या बॅनरवरून खासदार विनायक राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका केली. आम्ही कोणाचा दुस्वास केला नाही मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आम्ही त्यांचा मान ठेवतोच, ठाण्यात बॅनरवर तुम्ही बाळासाहेबांपेक्षा मोदी आणि अमित शहांना मोठं दाखवले आणि बाळासाहेब आणि आनंद दिघेंना छोट्याश्या कोपऱ्यात लपवलं यातूनच तुमचं खर रूप दिसून येत.

बातम्या आणखी आहेत...