आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार करून उत्साह:सांगोला येथे बापू-आबा गटाला चार, शेकापला दोन ग्रामपंचायती

सांगोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला तालुक्यातील ६ ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या आबा-बापू आघाडीने सहापैकी ४ गावांत सरपंचपद तर ३२ सदस्य जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. अनेक वर्षे वर्चस्व असणाऱ्या शेकापला २ जागांवर सरपंच आणि २५ सदस्य निवडले आहेत. नूतन सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादी भवन, सांगोला व आमदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून उत्साहाला बळ दिले.

निकालामुळे या गटाच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. शिवणे आणि बलवडी या दोन ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. आबा-बापू आघाडीने या दोन्ही गावात चांगले मताधिक्य घेत तेथील सत्ता उलथवून लावली. पाचेगाव आणि चिनके या दोन्ही गावातील सरपंचपदाची निवडणूक आबा-बापू आघाडीने बिनविरोध जिंकली होती.

बातम्या आणखी आहेत...