आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष संघटनात्मक आढावा:चंद्रशेखर ‎ बावनकुळे शुक्रवारी करणार शहराध्यक्ष निवडीची चाचपणी‎, विक्रम देशमुख कायम राहू शकतात‎

साेलापूर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर ‎ बावनकुळे हे गुरुवारी रात्री साेलापुरात येणार ‎ ‎ आहेत. ते मुक्कामी असतील. शुक्रवारी (दि. ‎ ‎ १२) ते दिवसभर शहर व जिल्ह्यातील‎ पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा‎ घेणार आहेत.‎ येणाऱ्या महापालिका, लाेकसभा,‎ विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता‎ पक्षाने तयारी सुरू केली आहे.

त्या दृष्टिने‎ ‎ शहर भाजपने बूथ‎ ‎ कार्यान्वित केले आहेत.‎ ‎ तसेच, निवडणुकीसाठी‎ ‎ पक्ष संघटनात्मक‎ ‎ पातळीवरील कामाची‎ ‎ माहिती घेण्यासाठी‎ प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दाैरा महत्वाचा‎ मानला जात आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष,‎ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.‎

भारतीय जनता पक्षाच्या सर्व शहर व जिल्हाध्यक्ष‎ निवडी येत्या १५ दिवसात पूर्ण होतील, असे प्रदेशने‎ स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोलापूर शहराध्यक्ष विक्रम‎ देशमुख यांच्याबाबतीतही निर्णय होऊ शकतो. येणाऱ्या‎ निवडणुका आणि देशमुखांचा राज्यस्तरीय भाजप‎ नेत्यांसोबतचा वावर पाहता त्यांना पदावर पुन्हा कायम‎ ठेवले जाण्याची शक्यता आहे. बदल करावयाचा‎ असेल तर पांडुरंग दिड्डी यांचे नाव पुढे येत आहे.‎