आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन फसवणूक फंडा सुरू:ऑनलाइन खरेदी-विक्री करत असाल तर सावधान

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री (वर्क आॅर्डर) कोणी आपल्याला ऑफर दिली. आपल्या मोबाइलवर आलेल्या लिंकला प्रतिसाद दिला असाल, आर्थिक व्यवहार करत असाल तर सावध राहा आपली फसवणूक होऊ शकते.ऑनलाइन वस्तूंची कमिशन बेसवर (खरेदी विक्री वर्क ऑर्डर) यामध्ये घरबसल्या काम करा आणि पैसे कमवा असे ऑफर असतात. मोबाइलवर मेसेज येतात. एक लिंक आपणाला पाठवली जाते. ती ओपन केली आणि आपली माहिती भरली तर आपली फसवणूक होऊ शकते. आपण कुठेतरी नोकरी डॉट कॉम व अन्य व्यवसायबाबत साइटवर माहिती घेतो.

ही माहिती हेरून हॅकसॅ मोबाइलवर एक लिंक पाठवतात. घर बसल्या कमिशन बेसवर ऑनलाइन स्वरूपात वस्तूंची लॉटरी (खरेदी विक्री ) करण्यासाठी सांगतात. सुरुवातीला विशिष्ट रक्कम कमिशन देऊ असे सांगितले जाते. तशी रक्कम आपल्या खात्यावर पाठवली जाते. यावर आपला विश्वास बसतो. पुन्हा दहा लाॅट साहित्य घेण्यासाठी प्रोसेस फी, नोंदणी या नावाखाली आपणाकडून विशिष्ट रक्कम घेण्यात येते. सहा लाॅट विकले आहे आपल्या खात्यात इतके पैसे जमा येत असे फक्त आभासी पद्धतीने भासवतात.

आणखी पूर्ण पेमेंट न दिल्यामुळे आपण चौकशी करतो. आणखी चार सेट विक्री होणे बाकी आहे त्यामुळे आणखी दहा सेट घ्या एकूण आपल्याला रक्कम देऊ असे सांगितात. जोपर्यंत आपण पैसे भरत राहतो, आपली माहिती आदान-प्रदान होते. कालांतराने लॉट साहित्य काही विक्री केल्याचे ते सांगत नाहीत आणि आपण भरलेले पैसे परत देत नाहीत. अशा प्रकारचे नवीन साईट सध्या सुरू आहेत. नागरिकांनी असे व्यवहार करण्याअगोदर त्याची खातर जमा करावी अथवा सायबर पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत माहिती घ्यावी, पुढील पाऊल उचलावी अशी माहिती सायबर पोलीस कक्षाचे फौजदार अविनाश नळेगावकर यांनी दिली.

ऑनलाइन खरेदी-विक्री भासवली जाते, पैसे दिले जात नाहीत
लहान मुलांचे कपडे, घरगुती साहित्य व विशिष्ट प्रकारचे साहित्य विक्री ऑनलाइन पद्धतीने होते. त्या साइटवर ऑनलाइन खरेदी विक्री होते असे भासवले जाते. त्यासाठी आपणाकडून पैसे घेतात. कमिशन बेसवर आपल्या खात्यात सुरुवातीला काही पैसे जमा करतात. नंतर पैसे देत नाहीत, अशी फसवणूक होते. अशा घटनांपासून सावध राहा, अशा साइट्स पासून किंवा फसव्या लिंकपासून सावध राहा, अशी माहिती सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सय्यद शौकत अली यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...