आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवसेंदिवस ऑनलाइन व्यवहार करताना फसवणुकीचे प्रकार वाढले असल्याने नागरिकांनी असे व्यवहार करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन सोलापुरातील नामवंत चार्टर्ड अकाउंटंट किशोर अदोने यांनी केले. ते भावसार व्हिजनच्या मासिक सभेत ऑनलाइन बँकिंग व्यवहार आणि दक्षता या विषयावर बोलत होते यावेळी व्हिजनचे अध्यक्ष श्रीराज निकते व सचिव मल्लिनाथ बासूतकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेची सुरुवात गायत्री महामंत्राने झाली. अध्यक्ष श्रीराज निकते यांनी प्रस्तावना केली. सचिव मल्लिनाथ बासूतकर यांनी मागील महिन्यातील व्हिजनच्या कार्याचा आढावा घेतला. शिवाजी उपरे यांनी सीए किशोर अदोने यांची ओळख करून दिली.
सीए किशोर अदोने यांनी सांगितले की ऑनलाइन बँकिंग व्यवहाराचे चारशेहून अधिक प्रकार असून या सर्वांची यादी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने एका पुस्तकाद्वारे प्रकाशित केली आहे. अनोळखी नंबर हुन आलेल्या मोबाईल कॉल वर तुमचा ओटीपी किंवा पासवर्ड किंवा डेबिट कार्डवरील सिव्हीवही नंबर शेअर करू नका, तसेच शक्य असेल तिथे कार्ड किंवा अॅपद्वारे पेमेंट करणे टाळा. वेगवेगळ्या व्यवहारासाठी वेगवेगळे बँक अकाउंट्सचा वापर करावा असेही त्यांनी सुचविले. हुबळीच्या अधिवेशनात सोलापूरच्या भावसार व्हिजन क्लबला बेस्ट क्लबचा अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांच्यहस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला.व पुरस्कार मिळवलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन वंदना पुकाळे आणि सीमा बासूतकर यांनी केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.