आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतुलनीय शोर्याच्या स्मृती:‘क्रांतिवीर अण्णांच्या कार्यातून प्रेरणा घ्या’ ; वैभवकाका नायकवडी यांचे प्रतिपादन

सातारा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी धुळे खजिना लूट, शेणोली पे ट्रेन लूट तसेच सातारचा जेल फोडला. अशा अनेक चळवळीतून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. क्रांतिवीर नागनाथअण्णांचे हे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावेत व या विचारांतून प्रेरणा घेऊन नवीन भारत उदयाला यावा, असे प्रतिपादन हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक वैभवकाका नायकवडी यांनी केले. ते क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी १० सप्टेंबर १९४४ रोजी सातारा जेल फोडून दाखवलेल्या अतुलनीय शोर्याच्या स्मृती म्हणून सातारा येथे साजऱ्या झालेल्या ७८ व्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सातारा कारागृहात वनवास भोगलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभाला व पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. डॉ. राजेंद्र शेजवळ म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा, जी. डी. बापू लाड यांच्या कार्याचे आपण वारसदार आहोत.

बातम्या आणखी आहेत...