आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामान्य दृष्टी असलेल्या (व्यवहारी) व्यक्तीला आकाशातच तारे दिसू लागतात. तुमच्याकडे कलात्मक दृष्टी असेल तर असे दिसते की, एखादा तारा हे सुंदर जग (गडद निळे आकाश) पाहणार आहे. पहिल्यासाठी आकाश एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यात हळूहळू हलक्या निळ्यापासून गडद काळ्या रंगात बदलत आहे आणि नंतरच्यासाठी जगातील सर्वात सुंदर चित्रकार ईश्वराला ओल्या फिकट निळ्या रंगावर काळा रंग देण्याची घाई आहे. दोन्ही डोळे जमिनीकडे परत वळताच त्यांना दारात दोन स्त्रिया एक लांब निळ्या रंगाची रजई (लिहाफ) विणत बसलेल्या दिसतात. सर्वसामान्य दृष्टीला वाटते, एक म्हातारी स्त्री खालच्या पायऱ्यांवर बसलेली आहे, तेही वरच्या पायऱ्यांवर बसलेल्या तुलनेने तरुण स्त्रीच्या पायाशी. कलात्मक दृष्टीला दिसते की, सासू आपल्या सुनेची किती काळजी घेते, तिने तिला दारात बसवले आणि बाहेरून काही धोका असेल तर सुनेला आधी वाचवता येईल. दोन्ही दृष्टींना दोघींच्याही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. एकाला तरुणीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाहून आश्चर्य वाटते, विशेषत: आर्थिक समस्या इतक्या लहान वयात त्वचेचे नुकसान करू शकतात. तर दुसऱ्यालाही डोळ्यांखालील सुरकुत्या आणि काळी वर्तुळे यांमधून खडतर जीवनातील समस्या डोकावताना दिसतात, पण वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावरची परिपक्वता पाहून त्याला वाटते की, तिने जीवनात एकटीने किती संघर्ष केला असेल, तरीही ती स्वत:साठी आणि मुलासाठी निर्मळ व मजबूत उभी आहे. दोन्ही स्त्रिया पाहणाऱ्यांकडे लक्ष न देता स्वतःतच मग्न आहेत. तरुणी तिची अनेक तुकड्यांची रजई पूर्ण करण्यात व्यग्र होती. तर, म्हातारीचा एक डोळा रजईपासून दूर होता.
सामान्य दृष्टीला वाटले की, त्या तरुणीला रात्री होण्यापूर्वी तिचे काम पूर्ण करायचे आहे, तर कलात्मक दृष्टीने पाहिले की, वृद्ध स्त्री आकाशातील सुंदर तारे तोडून ते रजई विणण्यात तिला मदत करत आहे. सामान्य दृष्टी पुढच्या फ्रेमकडे वळते तेव्हा कलात्मक दृष्टी त्यांना भटकण्यापासून थांबवते आणि म्हणते, ‘त्यांच्याकडे पाहा, त्या किती स्थिर, शांत आणि तरीही त्यांच्यात किती इच्छाशक्ती आहे, जणू त्या त्यात स्वतःचे जीवन विणत आहेत.’ बंगळुरू येथील ‘थर्मोफिशर सायंटिफिक’ येथील शास्त्रज्ञ डॉ. नेहा अभिषेक शर्मा यांनी ही काल्पनिक कथा डेहराडूनच्या ‘पुरकल स्त्री शक्ती’ या डेहराडूनच्या सामाजिक उपक्रमातील दोन महिलांभोवती रचली आहे, ती गावातील वंचित महिलांना हस्तकलेद्वारे सक्षम करण्याचा प्रयत्न देते. त्यांची प्रदीर्घ कथा येथे देणे कठीण आहे, परंतु ती एका छोट्या १२ X १८ फ्रेममध्ये सुंदरपणे रंगवली आहे. माझ्यासारख्या साध्या दृष्टीच्या माणसाला, तेही शास्त्रज्ञांच्या टेबलवरून ती केवळ एक कलाकृती दिसते. पण, डॉ. नेहासारख्या कलात्मक नजरेच्या व्यक्तीसाठी हे कथेहून अधिक काही आहे, ते जीवन आहे - कदाचित कोणाचे तरी.
फंडा असा ः आयुष्यातील घरगुती घडामोडींना सकारात्मक दृष्टिकोनाने बदलण्याची कला शिकतो, स्वतःच उद्याचे निर्माते होतो - गरीब त्याला ‘रजई’ म्हणतील आणि श्रीमंत ‘पेंटिंग’! परंतु, दोन्हींचे प्रदर्शन करता येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.