आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सराफाचे साडेसात लाखांचे सोने घेऊन बंगाली गायब

बार्शी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सराफाने दागिने करण्यासाठी दिलेले १४ तोळे सोने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना बार्शी येथे उघडकीस आली आहे. सराफ व्यावसायिकाचे यात सुमारे साडेसात लाखांचे नुकसान झाले. याबाबत येथील सराफ व्यावसायिक तन्मय रवींद्र बुडूख (रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी लालटू सुबल खेत्रपाल (सध्या रा. दाणे गल्ली, महाजन बोळ, बार्शी, मूळ रा. सोनाटिकरी, पांडुआ, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचे किराणा रोड येथे बाळकृष्ण लक्ष्मण बुडूख नावाने सराफी दुकान आहे.

बुडुख हे मागील एक वर्षापासून लालटूकडून दागिने बनवून घेत असत. २५ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर २२ रोजी फिर्यादी तन्मयने लालटू खेत्रपाल यास लेडीज अंगठी, कलकत्ती बांगड्या, गंठण, कोईमतूर झुबे व टॉप्स आदी दागिने बनवण्यासाठी १४२ ग्रॅम ३७० मिली सोने दिले होते. ५ नोव्हेंबरपर्यंत दागिने बनवून देतो, असे लालटूने सांगितले होते.

ठरल्याप्रमाणे ५ रोजी दागिने बनवून न दिल्याने फिर्यादी स्वत: ६ रोजी लालटूच्या दाणे गल्लीतील दुकानात गेले. त्यावेळी लालटूने तब्येत बरी नसल्याने ८ नोव्हेंबरपर्यंत दागिने देतो, असे सांगितले. त्यानंतर ७ रोजी बुडुख यांनी लालटूला फोन केला. फोन लागला नाही. नक्षत्र ज्वेलर्स यांचेही सोने घेऊन लालटू गेल्याचे समजले.

बातम्या आणखी आहेत...