आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उजनी लाल झाली तरी बेहत्तर; इंदापूरला पाणी देणार नाही, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा इशारा, तातडीने बैठक घेत निषेध

मोहोळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अनेक योजना अपूर्ण असताना, पाण्यावाचून शेतकरी होरपळत आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोणी या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याचा कुटील डाव रचला आहे. उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.

इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोणी उपसा सिंचन योजनेला ३४८ कोटी रुपये मंजूर केल्याचा अध्यादेश निघाल्यानंतर मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची तातडीची बैठक पार पडली. यावेळी विविध पक्षाच्या आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन, सीना-माढा उपसा सिंचन, एकरुख उपसा सिंचन, मंगळवेढा उपसा सिंचन, सांगोला उपसा सिंचन, सीना-भीमा उपसा सिंचन, दहिगाव उपसा सिंचन या उजनी जलाशयावर चालणाऱ्या योजना आजही अपूर्ण असताना इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोणी उपसा सिंचनसाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये देते.

हा सोलापूरकरांच्या डोक्यात दगड घालण्याचा डाव आहे. उजनी जलाशय हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे असूनही योजनेचे नाव बदलून अथवा जुनी योजना आहे असे सांगून सोलापूरकरांच्या डोक्यात दगड घालण्याचे महापाप बारामती आणि इंदापूरकर करत आहेत. हे कदापि होऊ देणार नाही, असा इशारा सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने देण्यात आला.

या वेळी उजनी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माउली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, जलतज्ञ अनिल पाटील, दत्तात्रय मोरे, भाजपचे भारत माने, शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर, वाल्मिकी महासंघाचे गणेश अंकुशराव, लक्ष्मण धनवडे, अॅड. बापूसाहेब मेटकरी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, महेश डोलारे, दिलीप गायकवाड, द्रोणाचार्य लेंगरे, नीलेश जरग आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...