आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:ऑनलाइन कर्ज प्रकरण, एटीएम बंद होणार म्हणून आलेले मेसेज, कॉलपासून सावध राहा; ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढते : सायबर सेल

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन कर्ज प्रकरण मंजूर करतो. मी अमूक बँकेतून बोलतो, तुमचे एटीएम बंद होणार आहे, त्यासाठी आपल्याला आलेल्या मेसेज लिंकवर क्लिक करा, ओटीपी विचारून बँक खात्यातून ऑनलाइन पैसे काढून घेणे. विविध बोगस कंपन्या स्थापन करून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणे अशा लोकांपासून सावध राहा, अशी माहिती सोलापूर शहर सायबर सेलचे पोलिस निरीक्षक शौकतअली सय्यद यांनी येथे बोलताना केले. शनिवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ यांच्या वतीने सायबर क्राइम या विषयावर पत्रकारांसाठी संवाद साधताना ते बोलत होते‌.

फौजदार अविनाश नळेगावकर, हवालदार पूजा कोळेकर, वसीम शेख, अमोल कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी स्वागत केले.

श्री. सय्यद म्हणाले, मोबाइलवर अथवा समाज माध्यमावर समोरच्या व्यक्तीवर ऑनलाइन संपर्क साधू नका, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले बँक अकाऊंटची माहिती देणे, पैसे भरणे असे प्रकार टाळा. ऑनलाइन चॅटिंग अथवा बनावट ई-मेल आमिषाला बळी पडू नका. यात आपली फसवणूक होऊ शकते. जादा परतावा देण्याचे दाखवून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवतात. नंतर फसवणूक करतात.

ऑनलाइन मैत्री करून कालांतराने पैशाची मागणी करून फसवणूक होऊ शकते, अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका, असे त्यांनी सांगितले.समाजमाध्यम, महिला, तरुणी, जातीय तेढ वाढवणाऱ्या घटनांवर वृत्तांकन करताना वृत्तपत्र प्रतिनिधींनी कशी काळजी घ्यावी, यावर भाष्य केले. पत्रकार विजय बाबर आणि समाधान वाघमोडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...