आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक स्नेहमेळावा:भजन, गीत, मिमिक्री, एकल , समूह नृत्य ,‎ लावणीच्या तालावर आशा वर्कर ‘झिंगाट’‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कलेची पार्श्वभूमी नसताना फक्त छंद‎ जोपासत आशा वर्कर महिलांनी वार्षिक‎ स्नेहमेळावा कार्यक्रमात भजन, लावणी,‎ सोलो डान्स, ग्रुप डान्स, गीत, मिमिक्री‎ करीत आपल्या कलेचे झिंगाट‎ सादरीकरण केले. याला प्रेक्षक महिलांतून‎ प्रचंड प्रतिसाद मिळाला.‎ आशा वर्कर महिलांचा लाल बावटा‎ आशा वर्कर व गटप्रवर्तक युनियन यांच्या‎ वतीने वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम‎ सोमवारी दुपारी बारा वाजता रंगभवन‎ सभागृहात आयोजित करण्यात आला‎ होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी‎ नगरसेविका नसिमा शेख होत्या.

गणेश‎ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात‎ आली. कला सादर करणारे आणि ‎ टाळ्यांची दाद देणारे हे दोन्ही आशा वर्कर‎ होते. अंजली शिंदे यांनी ‘ढोलकीच्या‎ तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी‎ डोलते इश्काच्या दरबारात...’ ही लावणी‎ सादर करताच उपस्थित महिलांनी शिट्या‎ आणि टाळ्या वाजवून कलेला दाद‎ दिली. यानंतर सोलो डान्स सादर झाला.‎ हे सोलो डान्स सैराट चित्रपटातील ‘झिंग‎ झिंग झिंगाट आता उतावीळ झालाे गुडघा‎ बाशिंग बांधलं...’ सादर झाले. गाणे‎ आणि डान्स या सादरीकरणाने सभागृह‎ डाेक्यावर घेतले.

‎ प्रेक्षक महिलांनी व्यासपीठाचा ताबा‎ घेतला. यानंतर ‘तुम बिन जाऊ‎ कहा...’,‘देश मेरा रंगीला..’,‘नही मिलेगा‎ एेसा घागरा...’,‘ जाे जाएगी बल्ले‎ बल्ले...’ अशी एकापेक्षा एक बहारदार‎ नृत्य आणि सुरेल गीते सादर करण्यात‎ आली. यावेळी संघटनेचे सिध्दाराम‎ उमराणी, शेवंता देशमुख, शकुंतला‎ पाणीभाते, मलेशाम कारमपुरी, मंगल‎ वावरगिरे, ज्याेती उराडे यांच्यासह‎ अनेकजण उपस्थित हाेते.‎

कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद‎
आशा वर्कर या आपापल्या घरचे काम करून दिवसभर ड्युटी करतात. त्यांनाही एक‎ दिवस त्यांच्यासाठी जगता यावे यासाठी वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आला.‎ दोन वर्षापासून कोरेानामुळे हा कार्यक्रम झाला नाही. यंदा या कार्यक्रमाला खुप चांगला‎ प्रतिसाद मिळाला. महिलांनी एकापेक्षा एक अशी कला सुंदर सादर केली.'''- पुष्पा पाटील, जिल्हा सचिव, संघटना‎

बातम्या आणखी आहेत...