आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात भारत जोडो यात्रा येणार:सोलापुरतील भटक्या जाती-जमाती कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे निघणार

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला येथील भारत जोडो पदयात्रेत आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस आज रोजी सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या वतीने भारत जोड़ो पदयात्रा संदर्भात हॉटेल सूर्या सोलापुर येथे पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा, सोमपा गतनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुणाताई वर्मा तसेच पत्रकार परिषदेचे आयोजक सोलापुर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष भारत जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना सोलापुर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष भारत जाधव म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारमुळे देशात प्रचंड महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगार विरोधी धोरणे, आर्थिक संकट, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, महिला अत्याचार, संविधानिक संस्थांचा गैरवापर, भ्रष्टाचार, पाशवी बहुमत पैशाच्या जोरावर अनेक राज्यात सत्ता परिवर्तन पत्रकारावर दबाव, जीएसटी मुळे उद्योग संकटात, धार्मिक व्देष, केंद्र आणि राज्यात भेदभाव निर्माण केला जात आहे. यापासून देशाला वाचविण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्या हितासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय नेते मा.खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा काढली आहे.

या भारत जोडो पदयात्रेला अदभूपूर्व प्रतिसाद मिळत असून 7 सप्टेंबर 2022 पासून सुरू झालेल्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतचे हे भारत जोडो पदयात्रा केरळ, तामिळनाडू, तेलंगणा नंतर दिनांक- 7 नोव्हेंबर 2022 रोजी देगलूर नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना अकोला येथे सहभागी होण्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निर्देश आहेत.

या भारत जोडो पदयात्रेत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.सुशिलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी सोलापूर शहर व जिल्हा भटक्या विमुक्त जाती-जमाती विभागाचे हजारो कार्यकर्ते अकोला येथे भारत जोडो पदयात्रेत सामील होण्यासाठी सोलापूर येथून निघणार आहेत.

तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, नागरिक बंधू भगिनींनी या भारत जोडो पदयात्रेत सामील होण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस भवन येथे आपले नावे, दोन फोटो, आधार कार्ड झेरॉक्स, मोबाईल नंबरसह नोंदवावी. असे आवाहन सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष भारत जाधव यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...