आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:भावसार नागरी सहकारी पतसंस्थेचा सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावसार पतसंस्थेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हिंगुलंबिका सांस्कृतिक भवन, गणेश पेठ येथे झाली. यावेळी पतसंस्थेने मार्च २०२२ अखेर एक कोटी नव्वद लाखांचा ढोबळ नफा मिळवला असून, या वर्षी धडक वसुली मोहीम सर्व संचालकांनी घेतल्यामुळे याचा परिणाम दिसून आल्याचे पतसंस्थेचे चेअरमन राजकुमार हंचाटे यांनी सांगितले.

सभेचे सूत्रसंचालन संचालक शशिकांत रंगदळ यांनी केले. सभासदांनी व समाजबांधवांनी जास्तीत जास्त ठेवी पतसंस्थेत ठेवण्याचे आवाहन केले. संस्थेचे कार्यक्षेत्र सोलापूर जिल्ह्यात वाढवण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आला. यास सर्व सभासदांनी एकमताने मान्यता दिली. यंदाच्या वर्षी १३ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापक शशिकांत पुकाळे यांनी यावेळी आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली. संस्थेचे व्हाइस चेअरमन शाम लाडे, संचालक किरण क्षीरसागर, शिवकुमार पुकाळे, सुभाष वैकुंठे, अनिल अण्णे, बाबूलाल गोयल, जयश्री पिसे, सौ. पवन वायचळ आदी संचालक उपस्थित होते. सोने खरेदीसाठी ९ टक्के व्याजदर, नवीन घर बांधणे, फ्लॅट खरेदी करण्यासाठी १० टक्के व्याजदर केल्याने तसेच संस्थेची वसुली चांगली झाल्याने संस्थेचा ए.पी.ए. शून्यावर आणल्याने सभासदांनी संचालकांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...